27 रुग्णांवर शस्त्रक्रिया
माणगाव | प्रतिनिधी |
माणगावमध्ये शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे नेत्र शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.प्रकाश पाटील व त्यांच्या सहकार्यांनी 106 रुग्णांची तपासणी करून 27 नेत्ररुग्णांना पनवेल येथे नेऊन त्यांच्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.सदरचे शिबीर हे दर महिन्याच्या एका बुधवारी होत असते .
शिबिरासाठी महेंद्र मेथा यांनी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली होती. शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विजय मेथा, तनुजा हेमंत मेथा ,छाया मेथा, विधिता मेथा,मनीष मेथा,सुप्रिया शिंदे, प्रसाद कांबळे यांच्यासह शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेलचे व्यवस्थापक प्रकाश पाटील, सपना शर्मा, नंदिनी देवघरकर, ज्योती पाटील, अमर पाटील, यांनी सहकार्य करीत विशेष परिश्रम घेतले.