आरोग्य शिबिरात २३० जणांची तपासणी

। खोपोली । प्रतिनिधी ।
अंबिवली गावात पातळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, पिल्लेज कॉलेज मोहपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य शिबिराचे शुक्रवार, दि. 9 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास परिसरातील नागरिक, अबालवृद्ध, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 230 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच उपस्थितांना पर्यवारण संवर्धनाचा संदेश देत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

खालापूर तालुक्यातील आंबिवली गावातील भैरवनाथ मंदीराच्या सभामंडपात आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक सहअधिकारी प्रशांत भोसले, के.एम.सी कॉलेजचे प्रा. डॉ. प्रताप पाटील, थरमॅक्स कंपनीचे मॅनेजर सुनील कदम, माजगाचे सरपंच गोपिनाथ जाधव, उपसरपंच सुवर्णा पाटील, मा. उपसरपंच राजेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते अविनाश कांबळे, नरेश पाटील, रवींद्र पाटील, अनंत लबडे, पातळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरूण जाधव यांच्यासह पिल्लेज कॉलेजच्या कलावती उपाध्याय, अनिता मॅडम, विद्यार्थी, प्राथमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

आरोग्य शिबीर, कापडी पिशव्यांचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन पातळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरूण जाधव, उपाध्यक्ष रूपेश जाधव, कार्याध्यक्ष अमित पाटील, खजिनदार हरेश जाधव यांनी केले होते. यामध्ये आयोग्य शिबिरात हृदय शस्त्रक्रिया, अन्ननलिका शस्त्रक्रिया, मणक्याची शस्त्रक्रिया, मुत्रशयाचा मार्ग संकोचीत होणे, कर्करोग, यकृताचा आजार, डोळ्यांचे विकार, नाक, कान, घसा, पुरूष ग्रंथी, किडणीचे आजार, मुतखडा शस्त्रक्रिया आदी रोगांची तपासणी करण्यात आली.

Exit mobile version