। कर्जत । वार्ताहर ।
शिवसेना आणि सनराईझ मेडिकल फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात 485 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी मोफत चष्मे वाटपही करण्यात आले.
कर्जत मुद्रे विभागातील श्री मुद्रेश्वर मंदिराच्या सभागृहात संतोष पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी उत्तम कोळंबे, पंढरीनाथ राऊत, राजाराम शेळके, समीर साळोखे, राजेश जाधव, संचिता पाटील, भालचंद्र जोशी, कृष्णा घाडगे, ज्ञानेश्वर भालीवडे, माधव कोळंबे, वसंत मोधळे, संदीप पाटील उपस्थित होते. पिंकी पाटील, डॉ. रोहित, डॉ. सुप्रिया, डॉ. सुमित, हरखेश पाडे, दिनेश कोकल, वंदना चौधरी यांनी रुग्णांची तपासणी केली.