| खारेपाट । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील श्री जोगेश्वरी माता क्रिडा मंडळ आवास राणे आळीतर्फे भव्य जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सिध्दीविनायक झिराड संघ विजेता ठरला, विजेत्या संघास 70 हजार रुपयांचे पारितोषिक व स्व. अर्चना प्रभाकर राणे स्मृती चषकाचा मानकरी ठरला. विजेत्या संघास पारितोषिक आवास ग्रामपंचायतक सरपंच अभिजीत राणे व सर्व मान्यवरांच्या हास्ते देण्यात आली.
धोकवडे संघ विजेते ठरले स्पर्धेत मॅन ऑफ दि मॅच योगेश नाईक, चौकार किंग मंगेश पाटील, सिक्कसर किंग मंथन नाईक, उत्कृष्ठ फलंदाज सचिन म्हात्रे व गोलंदाज विराट मढवी, व मॅन ऑफ दि मॅच सिरिज मंथन नाईक व फायनल मॅन ऑफ दि मॅच योगेश नाईक या खेळाडुचा उल्लेखनीय खेळी केल्याबद्दल त्यांना वाशिंग मशिन, फ्रिज, एल. ई. डी, टी. व्ही. अशी विवधि भव्य वस्तुची मान्यवरांच्या हास्ते भेट वस्तु देवून खेळाडुना सन्मानित करण्यात आले.
सदर स्पर्धा जोगेश्वरी माता येथिल भव्य क्रिडांगण चार दिवस खेळविण्यात आले. सिया म्हात्रे आवास हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्पर्धा संपन्न झाल्या व मंडळाचे आधार स्तंभ सोन्या म्हात्रे व सर्व खेळाडुचे सहकार्य लाभले. सर्व खेळाडूंना शुभेच्छा देताना प्रमुखअतिथी सरपंच अभिजीत राणे म्हणाले की खेळाडुंच्या प्रगती साठी सर्वोत्तपरी सहकार्य केल जाईल. तसेच पुजा राणे यांनी खेळाडुंना भेटवस्तू टि शर्ट दिले.स्पर्धेचा बक्षिस वितरणासाठी सरपंच, उप सरपंच, ग्रा. पं. सदस्य मंडळाचे पदाधिकारी सर्व खेळाडू व आवास परिसरातील विविध स्थरातील मान्यवर मंडळी व महिला वर्ग उपस्थित होता. स्पर्धा पाहण्यासाठी मोठया संख्येने क्रिडा रसिक प्रेक्षक हजर होते. स्पर्धेत जिल्हयातील संघ सहभागी झाले होते.