नेत्र शिबिरात ७४ रुग्णांची तपासणी

३६ रुग्णांवर शस्त्रक्रिया
| माणगाव । वार्ताहर ।
माणगावात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजय मेथा भातवाले बुधवार (दि. 12) रोजी वृत्तपत्र विक्रेते पितांबर मेथा यांचे हॉल जुने एसटी स्टॅन्ड जवळ माणगाव याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी 74 रुग्णांची तपासणी करून 36 नेत्ररुग्णांना पनवेल येथे नेऊन त्यांच्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

या शिबीरात माणगाव,महाड,म्हसळा,श्रीवर्धन,तळा,पोलादपूर,रोहा आदी तालुक्यांतील जवळपास गेल्या 6 महिन्यांतील शिबिरात 400 हुन अधिक रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली असून गोरगरीब जनतेला दृष्टी मिळून जनसेवा हीच खरी ईश्‍वरसेवा समजून यापुढेही आपण हे शिबीर आयोजित करणार असून पुढील शिबीर बुधवार (दि.9) रोजी याचठिकाणी होणार आहे. सदर शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विजय मेथा, तनुजा हेमंत मेथा, छाया मेथा, विधिता मेथा, मनीष मेथा, सुप्रिया शिंदे यांच्यासह शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेलचे डॉ.संदेश रसाळ,डॉ,टीम व्यवस्थापक प्रकाश पाटील, अंशु पाल,नंदिनी देवघरकर, प्रिया अग्निहोत्री, नरेश आवळा यांनी सहकार्य करीत विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version