खोदलेले रस्ते नवी मुंबईकरांसाठी डोकेदुखी

नागरिकांचा संताप व्यक्त, कामे संथ गतीने चालू

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबई मध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणांची कामे सुरु असणारी आहेत त्याचबरोबर, मलनिस्सारण वाहिन्या, महानगर गॅसची पाईप लाईन, पाण्याची पाईप लाईन, भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे अशी अनेक विकासकामे सुरु असल्यामुळे ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आल्यामुळे नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. रस्ते खोदून ठेवण्यात आल्यामुळे दुचाकी वाहनचालकांना व पादचार्‍याना रस्त्याने चालणे जिकिरीचे झाले आहेत. खोदकाम करुन ठेवण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही चालायचे तरी कुठून असा सवाल नागरीक उपस्थित करत आहेत.

वाशी येथील अग्निशामन केंद्राजवळ, कोपरखैरणे ब्लुय डायमंड चौक, महापे येथील भुयारी मार्ग, त्याचाप्रमाने मुळगावठाणा लगतचे रस्ते आदि ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु आहेत ती कामे संथ गतीने पार पडत असल्यामुळे वाहनचालकांना व पादचार्‍यांना रोजच्या जाण्या-येण्याच्या मार्गात बदल करावा लागत आहे. तर ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्या ठिकाणी पुढे रस्ता बंद आहे. असा फलकही लावण्यात न आल्यामुळे वाहतुक कोंडीत भर पडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना व पादचार्‍यांना पुढे जाऊन परत गेल्या पावालांनी परत यावे लागते. त्यामुळे वाहनचालक व पादचारी त्रस्त झाले आहेत.

ज्या ठिकाणाची रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तरी देखील त्या रस्त्यंवरील वाळू, सिमेंट भुशाची कस तशीच पडून रहिल्यामुळे वाहने घसरून होऊन अपघात होण्याच्या घटना देखील घडत आहेत. महानगरपालिका, महाविरण, महानगर गॅस, रिलायंस आदि कंपनीचे एकमेकाशी विचारविनिमय नसल्यामुळे रस्ते वारंवार खोदण्यात येतात. जर भूमिगत विद्युत वाहिन्या टाकलेल्या असताना एखाद्या वेळी विद्युत पुरवठा खंडित झाला तर ज्या ठिकाणी नादुरुस्त झाली आहे, ते शोधण्यासाठी रस्ता खोदण्यात येतो.

रस्ते खोदल्यांनतर ते पूर्णपणे व्यवस्थित बुझवण्यात येत नसल्यामुळे रस्त्यांना खड्डे तसेच राहतात. रस्त्यांची कामे सुरु असताना फुटपाथ वर रस्त्यांतील डेब्रिज ठाकण्यात येते पंरतु रस्त्यांची कामे झाल्यांनतर मात्र रस्त्यांतील कच्चा माल हा तसाच फुटपाथवर राहतो. त्यामुळे पादचार्‍यांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तरी रस्त्यांची असणारे कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी व ज्या ठिकाणी रस्त्यांची काँक्रिकीटकरणाची कामे पूर्ण झाली आहेत त्या रस्त्यांवरील वाळू व रेतीचा थर हा साफ करण्यात यावा. अशी मागणी नवी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version