‘एमएसएटी’मुळे करिअर निवडण्याची उत्कृष्ट संधी

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

बांदा येथील व्हि.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल प्रशाळेत सुरू असलेल्या एम.एस.ए.टी. या व्यावसायिक विषयामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना करिअर निवडण्याची उत्कृष्ट संधी प्राप्त झाली आहे. कोणताही व्यवसाय निवडल्यानंतर त्या व्यवसायामध्ये करत असलेले काम हे कुठच्याही कमी दर्जाचे नसते त्या कामामधील आपले कौशल्य महत्त्वाचे असे मत युवा उद्योजक संकेत वेंगुर्लेकर यांनी व्ही.एन.नाबर स्कूल मधील जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमाला बोलताना व्यक्त केले आहे.

यावेळी मुख्याध्यापिका मनाली देसाई, रिया देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते. संकेत वेंगुर्लेकर पुढे म्हणाले की, एम.एस.ए.टी या विषयांमध्ये एक विभाग गृह आरोग्य असा आहे. ज्या विभागामध्ये खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रात्यक्षिक दिले जाते. यातूनच हॉटेल मॅनेजमेंट सारख्या विषयाकडे वळण्यासाठी मुलांना सुवर्णसंधी प्राप्त होऊ शकते. तसेच, त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट मधील विविध विषयांवर संकेत वेंगुर्लेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Exit mobile version