विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटीत 50 टक्क्यांची कपात

महाराष्ट्र सरकारकारचा निर्णय
। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र सरकारने आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी 50 टक्क्यांनी कमी केले आहे, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने शुक्रवारी सांगितले. तसेच यासंदर्भातील अधिसूचना गुरुवारी जारी करण्यात आल्याचेही अधिकार्‍याने स्पष्ट केले.
आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी, खर्चाच्या 300 टक्क्यांवरून 150 टक्क्यांवर आणण्यात आली आहे, असे अधिकार्‍याने पीटीआयला सांगितले.
अधिकार्‍याने सांगितले की, आयात केलेल्या विदेशी मद्याच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वर्षाला 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीमुळे सरकारचा महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे कारण यामुळे एक लाख बाटल्यांवरून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल

Exit mobile version