सध्या खरेदीसाठी नागरिक सध्या गर्दी करीत आहेत. यावेळी कोणतेही सोशल डिस्टंन्सचे कोणतेही पालन होताना दिसत नाही. पोलीस सतत नागरिकांना बाजारपेठेत आवाहन करीत होते. मात्र, पोलिसांच्या सूचनांकडे नागरिक कानाडोळा करताना दिसून आले.
गणेशोत्सवात येणार्या भक्तांना कोणतीही सक्ती नसली तरी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचे उपाय करणे सर्वांसाठीच उपयुक्त असणार आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरकारने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
अदिती तटकरे, पालकमंत्री