। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील पाणोसे ग्रामस्थ सार्वजनिक विकास मंडळ मुंबई आणि पाणोसे ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 14 मे रोजी सकाळी 8.30 ते रात्री 12 यावेळेत सत्यनारायण महापूजा आणि महिला मंडळ हळदीकुंकु अंतर्गत रांगोळी, महिलांसाठी पैठणी स्पर्धा, संगीतखुर्ची स्पर्धा तसेच लहान मुलांसाठी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, 10 वी, 12 वी व पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ असे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी पाणोंसे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला शंकर शिंदे, पदवीधर शिक्षक शंकर शिंदे, विज्ञान शिक्षक विवेकानंद गोडबोले, सौ. गोडबोले, उपशिक्षक संजीवन खैरे, सौ. खैरे उपस्थित होते. मुंबई मंडळाच्या पदाधिकार, अध्यक्ष दत्तात्रेय मोरे, सचिव बाळाराम मांडावकर, कार्याध्यक्ष राजेश कुळे, ग्रामस्थ पदाधिकारी अध्यक्ष बळीराम तांबे, पोलीस पाटील कृष्णा गुजर, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य भीकू शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.