खंडाळे, नेहुली प्रचार रॅली सभांचा जल्लोष

। अलिबाग । प्रतिनिधी ।

महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारार्थ खंडाळे ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी सायंकाळी प्रचार रॅली काढण्यात आली. दिनानाथ पाटील यांच्या घरासमोरुन रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली सागाव मारूती येथून तळवली, मधलापाडा, रुळे काळोशी, धोलपाडा, पवेळे, साईनगर, खंडाळे, नेहुली अशी काढण्यात आली. रॅलीची सांगता नेहुली येथील संतोष पाटील यांच्या घरासमोर झाली. त्यानंतर रॅलीचे रुपांतर सभेत झाले. प्रचार रॅली, सभांचा जल्लोष खंडाळे, नेहुलीमध्ये पहावयास मिळाला.

यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या प्रियदर्शनी पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी सदस्य अ‍ॅड. गौतम पाटील, खंडाळेचे सरपंच नासिकेत कावजी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पिंट्या ठाकूर, तालुका प्रमुख शंकर गुरव, काँग्रेसचे भरत पाटील, शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष राकेश पाटील, खंडाळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय थळे, माजी सरपंच मीना पाटील, विलास थळे, विनोद पाटील, विलास वालेकर, नरेश गोंधळी, ग्रामपंचात सदस्य रुचिता भगत, संदेश पाटील, रुपेश पाटील, निलीमा कावजी, राखी गुरव यांच्यासह यशवंत पाटील, दिनानाथ पाटील, अभिजीत पाटील, समीक्षा पाटील, रंजिता पाटील, संतोष पाटील, अनेष पाटील, संतोष गुरव, उदय वेळे, हितेंद्र थळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचार रॅलीला कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. दुचाकीवर स्वार होत लाल बावटा हातात फडकवत चित्रलेखा पाटील यांचा जयघोष करण्यात आला. गळ्यात लाल मफलर घालून प्रचारात असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. मतदारांसह कार्यकर्त्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे एक वेगळा उत्साह निर्माण झाला होता. अनेकांनी शिट्टी वाजवून ङ्गलाल बावटे की जय, महाविकास आघाडीचा विजय असोफ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे संपूर्ण खंडाळे महाविकास आघाडी व शेकापमय झाल्याचे दिसून आले.

शिंदे गटाचे रुपेश पाटील शेकापमध्ये
खंडाळे ग्रामपंचायतीचे सदस्य रुपेश पाटील यांनी शिंदे गटातील कारभाराला कंटाळून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा शुक्रवारी सायंकाळी नेहुली येथे संतोष पाटील यांच्या निवासस्थानी पार पडला. खंडाळेचे सरपंच नासिकेत कावजी यांच्या पुढाकाराने शेकापच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन रुपेश अनंत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केल्याने ऐन निवडणुकीत आ. दळवींना मोठा फटका मानला जात आहे.
Exit mobile version