रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील सर्व शेकाप कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा केला. तालुका चिटणीस राजेश सानप यांच्या नेतृत्वाखाली संभे येथे तर जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी यांच्या हस्ते शेणवई मध्ये तर अनंत वाघ यांच्या हस्ते नागोठणे येथील शिवाजी चौकात पक्षाचा लाल बावटा दिमाखात फडकविण्यात आला.पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री गणपतराव देशमुख यांच्या नुकत्याच झालेल्या निधनामुळे पक्ष ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बचेंगे तो और भी लढेंगे असे सांगत कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत रहावे असा संदेश दिला आहे. तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपापल्या घरावर लाल बावटा फडकवत वर्धापनदिन साजरा केला आहे.