I पनवेल I विशेष प्रतिनिधी I
टेंभोडे ग्रामस्थ आणि पनवेल महानगर पालिकेच्या सह आयुक्त यांची मालमत्ता करासाठी, गावाचे सर्वेक्षण करण्याबाबत सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अॅड. विजय गडगे आणि ग्रामस्थ यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. संपूर्ण गावाने महानगर पालिका क्षेत्रातून वळवली आणि टेंभोडे गाव वगळण्यात यावेत, अशी जोरदार मागणी आयुक्त वंदना गुळवे यांच्याकडे केली.
या बैठकीत सर्व ग्रामस्थांसह सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सुनील मानकामे (इंचार्ज मालमत्ता कर विभाग), सदाशिव कवठे (ब प्रभाग अधिकारी) आणि इतर महानगर पालिका अधिकारी वर्ग उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिका स्थापना झाल्यानंतर तेथील 14 गावच्या ग्रामस्थांनी अशा प्रकारे संघर्ष केला असता त्यांना महानगरपालिकेतून वगळून स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून अधिकार देण्यात आले . अन्यायकारक समजल्या जाणार्या विविध करांमधून करदात्यांची सुटका झाली असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
जर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनेक ग्रामपंचायतींनी स्थानिक मागणी म्हणून विरोध व अन्यायकारक कराबाबत संघर्ष केला तर भविष्यात अंदाजे पनवेल महानगरपालिका हद्दीतील साधारण 12 गावांतील ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे महानगरपालिके पुढे एक नवे जनआंदोलन होण्याचे चित्र निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.