| टोकियो | वृत्तसंस्था |
ऑलिम्पिकमधून क्रीडा प्रकाराला वगळण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) अधिकारात रविवारी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संघटनात्मक वादांमुळे 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमधून वेटलिफ्टिंगला वगळण्याची दाट शक्यता आहे. ‘आयओसी’ला बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारांमधील वादाला यंदा सामोरे जावे लागले. त्यामुळे ‘आयओसी’ला कोणत्याही क्रीडा प्रकारचे पूर्ण सदस्यत्व रद्द करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहे.