धक्कादायक! आयसीसी टी 20 वर्ल्डकपमधून यांना वगळले

। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून टी-20 विश्‍वचषकासाठी 15 खेळाडूंचा समावेश असणार्‍या भारतीय संघाची बुधवारी घोषणा करणार आहे. नियमांनुसार 10 सप्टेंबरपर्यंत या स्पर्धेमध्ये भाग घेणार्‍या संघांना 15 जणांचा चमूची यादी जाहीर करावी लागणार आहे. तरी संघामध्ये कोणाला स्थान मिळणार आणि कोणाला नाही याबद्दल क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. त्यातच भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनिल गावस्कर यांनी या स्पर्धेसाठी त्यांच्या मते कोणता संघ पाठवला पाहिजे याबद्दलची यादीच जाहीर केली. मात्र गावस्कर यांनी निवडलेला संघ पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.

गावस्कर यांनी आपल्या संघात के. एल. राहुलला सलामीवीर म्हणून निवडलेलं नाही. त्यांनी रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून राहुलऐवजी इतर खेळाडूच्या नावाचा सल्ला दिलाय. विशेष म्हणजे गावस्कर यांनी निवडलेल्या 15 खेळाडूंच्या संघात शिखर धवन आणि श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आलेलं नाही.

गावस्कर हे त्यांच्या क्रिकेटबद्दलच्या ज्ञानासाठी आणि अचूक अंदाजांसाठी ओळखले जातात. त्यामुळेच त्यांनी राहुलची निवड न केल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांनी राहुलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा सल्ला देत कर्णधार विराट कोहलीने सलामीला फलंदाजी करावी असे म्हटले आहे.

गावस्कर यांनी तिसर्‍या क्रमांकावर सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. मागील काही महिन्यांपासून सूर्यकुमारने त्याच्या फलंदाजीने अनेकांना प्रभावित केले असून इंग्लडविरोधातील मालिकेत सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पण केले आहे. 46.33 च्या सरासरीने त्याने या मालिकेत 139 धावा केल्यात. एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमारने 62.00 च्या सरासरीने धावा केल्यात. सूर्यकुमार कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. तो तिसर्‍या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर फलंदाजीला येऊ शकतो. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी के. एल राहुलची निवड गावस्कर यांनी आपल्या संघात केलीय. सध्या राहुल हा टी 20 मधील आघाडीचा खेळाडू आहे.

गावस्कर यांनी निवडलेला संघ
रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, रविंद्र जाडेजा, वाशिंग्टन सुंदर, सप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, शार्दुल ठाकूर, दिपक चहर, मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहल.

Exit mobile version