कुटूंब थोडक्यात बचावले; घराचे मोठे नुकसान
चालक गंभीर जखमी
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील मुबंई गोवा महामार्गावर कोलाड खांब दरम्यान खांब नजीक एका घरात भरधाव मालवाहू कंटनेर घुसल्याने मोठा आपघात घडला असून या घटनेत घरातील कुटूंब बालबाल बचावले आहे. घराचे खूप मोठे नुकसान झाले असून एक दुचाकी उभी असलेली चक्काचूर झाली तर चालक गंभीर जखमी झाला आहे.
०३ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास मुबंई गोवा महामार्गावर माणगाव कोलाडकडून नागोठणेच्या दिशेने जाणारा भरधाव मालवाहू कंटनेर क्रमांक एन एल ०१ ए बी ००१९ या वरील चालकाचा अचानक ताबा सुटल्याने मार्गालागत असलेल्या वस्तीमधील चेतन मेहता व प्रवीण भानत यांच्या दुकानातील घरात घुसल्याने एकच खळबळ उडाली, तर घरातील कुटूंब थोडक्यात बचावले आहेत, तर चालक गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस घटनास्थळी पोहचले असून चालकाची कोणतीही ओळख पटली नसून त्याला उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती कोलाड पोलीस स्टेशनचे ए पी ये घायवत यांनी दिली आहे. पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
