बालहत्याकांडातील आरोपी गावित भगिनींची फाशी रद्द

आता मरेपर्यंत जन्मठेप
। मुंबई । प्रतिनिधी ।
नव्वदीच्या दशकात संपूर्ण राज्याला हादरवून टाकणार्‍या बालहत्याकांड प्रकरणातील दोषी रेणुका शिंदे व सीमा गावित या बहिणींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी न्यायालयाने गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप सुनावली आहे. या दोघींचा गुन्हा माफीच्या लायकीचा नाही. मात्र, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई झाली. त्यामुळे गावित बहिणींची फाशी रद्द करुन न्यायालयाने त्यांना जन्मठेप सुनावली आहे. फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीत राज्य सरकारने केलेली दिरंगाई अक्षम्य आहे, असे म्हणत न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने राज्य सरकारवर निकालात ओढले ताशेरे ओढले.

Exit mobile version