काळभैरव पतसंस्थेची कार्यकारिणी जाहीर

| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |

काळभैरव नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मुरूडच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी दीपक अनंत पालशेतकर यांची तर उपाध्यक्षपदी स्नेहा किशोर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सचिवपदी निवास प्रभाकर रसाळ, कोषाध्यक्ष सुरेश विश्वनाथ कासेकर यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. संचालकपदी उषा सुधिर खोत, संजय सुरेश भोसले, मनोहर गजानन कासेकर, दीपक वसंत मयेकर, प्रतिक रमेश पेडणेकर, आशिष श्रीहरी नागवेकर व सुप्रेश गोपीचंद खोत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर कार्यकारिणीचा कालावधी 2023-2024 ते सन 2028-2029 इतका असणार आहे.

Exit mobile version