सुदर्शन सहकारी भात गिरणीची कार्यकारणी जाहीर

| रेवदंडा | प्रतिनिधी |

मांडळा येथील मरहूम भाईसाहेब घय्ये सभागृहात मंगळवारी (दि. 21) सुदर्शन सहकारी भात गिरण व भात खरेदी विक्री संघ लि. मांडला संस्थेच्या सभापती पदाची निवड घेण्यात आली. मुरूड-जंजिरा सहकारी अधिकारी, सहाय्यक निबंधक कार्यालय मुरूडचे प्रमोद वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली व सुदर्शन सहकारी भात गिरण व भात खरेदी विक्री संघ, मांडलाचे मॅनेजर अरूण महादेव घरत यांचे सहकार्य लाभले.

सुदर्शन सहकारी भात गिरण व भात खरेदी विक्री संघ, मांडला संस्थेच्या रिक्त असलेल्या सभापती पदासाठी संचालक जाकीर अली हमदुले यांचा ऐकमेव अर्ज प्राप्त झाल्याने, निवडणुक अधिकारी प्रमोद वाघमारे यांनी जाकीर अली हमदुले यांची सभापती पदासाठी बिनविरोध निवड जाहीर केली. या निवडणुकीसाठी उपसभापती रफायल वेगस, संचालक संतोष कांबळी, संचालक प्रदिप धनावडे, संचालिका यास्मीन घय्ये, फैयाज हुसेन दळवी, लक्ष्मी थळे, निस्सार नाईक, मंगेश थळे, व अरूण गुरव यांनी निवडणुक प्रक्रियेत सहभाग घेतला होता. सुदर्शन सहकारी भात गिरण व भात खरेदी विक्री संघ, मांडला संस्थेच्या रिक्त असलेल्या सभापती पदासाठी संचालक जाकीर अली हमदुले यांची बिनविरोध निवड झाल्याने उपस्थित निवडणुक अधिकारी प्रमोद वाघमारे, उपसभापती, संचालक, संचालिका, मॅनेजर यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version