बचतगटांच्या पदार्थांचे प्रदर्शन व विक्री

स्वदेस फाउंडेशनने दाखवला यशाचा मार्ग
। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात स्वदेस फाऊंडेशन व पंचायत समिती म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी तयार केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले असून महिला स्वयंसहाय्यता समूहाचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकूण नऊ बचतगट सहभागी झाले असून या गटांनी दिवाळी फराळ, पापड, लोणचे, मसाले अशा पदार्थांचा समावेश केला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती म्हसळा अभियानाचे तालुका व्यवस्थापक आबा साळवे, प्रभाग समन्वयक गोरठे, स्वदेस फाऊंडेशन वरिष्ठ समन्वयक अमोल पाटील व शुभदा सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत असुन अशी संधी मोठ्या प्रमाणात मिळावी अशी अपेक्षा स्वयंसहाय्यता समुहांकडुन होत आहे.

Exit mobile version