जागतिक वारसा दिनानिमित्त नेरळ स्थानकात प्रदर्शन

| नेरळ । वार्ताहर ।                

18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसादिन म्हणून समजला जातो. या दिवसाचे औचित्य साधून नेरळ रेल्वे स्थानकात नेरळ माथेरान नेरळ मिनीट्रेन बद्दल माहिती देणार्‍या हेरिटेज वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. दरम्यान, रेल्वेमध्ये गार्ड असलेले अजय हाते यांनी स्वतः मेहनत घेऊन बनवलेली मिनीट्रेन या प्रदर्शनात मांडण्यात आली होती.

जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने नेरळ माथेरान या मार्गाचे महत्व लक्षात घेऊन हेरिटेज ट्रेन असलेल्या नेरळ माथेरान नेरळ या मागार्वरील हेरिटेज वस्तूंचे प्रदर्शन नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात मांडण्यात आले होते.मध्य रेल्वे मध्ये लोकल वरील गार्ड असलेलले अजय हाते यांनी 2003 ते 2006 या कालावधीत नोकरी मधून वेळ मिळाल्यांनतर मिनीट्रेनची प्रतिकृती बनवली होती.आठ फूट बाय बारा फूट अशी मिनीट्रेन ट्रॅक आणि सोबत त्या नॅरोगेज ट्रॅकवरून चालणारी हुबेहूब वाटावी अशी मिनीट्रेन बनवली होती. त्यांची पूर्णपणे फोल्डिंग होणारी मिनीट्रेन मध्य रेल्वे कडून आयोजित अनेक प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.नॅरोगेज ट्रक,सिग्नल यंत्रणा,प्रवासी डब्बे, इंजिन असे सर्व काही असलेल्या हि मिनीट्रेन हाते यांनी रेल्वे च्या माथेरान गाडीला 100 वर्षे पूर्ण झाली त्यावेळी माथेरान स्थानकात मांडली होती.

तसेच मुंबई छत्रपती शिवाजी महाराज येथील प्रदर्शन, मुंबई सायन कॉलेज, कोलकाता, नागपूर, लोणावळा अशा अनेक ठिकाणी प्रदर्शनार्थ मांडली आहे. त्या त्या प्रदर्शनात अजय हाते हे तेथे उभे राहून मिनीट्रेन बद्दल माहिती देत असतात. त्याचवेळी या जागतिक वारसा दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनात नेरळ माथेरान मिनीट्रेन संबंधी वापरलेलया विविध वस्तू आणि 1907 मध्ये नेरळ स्थानकात बसवलेली घंटा देखील लावण्यात आली होती. नेरळ स्थानकातील वेटिंग रूम मध्ये भारावलेल्या प्रदर्शनात असंख्य प्रवासी यांनी भेटी देऊन माहिती घेतली आहे.

Exit mobile version