। अलिबाग । प्रतिनिधी ।
सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलूम यांचे हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री अलिबाग येथील सार्वजनिक वाचनालय डोंगरे हॉल येथे सुरू आहे. हे प्रदर्शन 12 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनातील हातमाग विणकाम करून तयार केलेले कापड अत्यंत चांगला दर्ज्याचे असल्यामुळे अलिबागकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हातमाग कापड प्रदर्शनाचे प्रमुख पांडुरंग पोतन यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी व हातमागाच्या विणकाम करून वापरण्या योग्य कापड तयार केले जाते. या कापडाच्या वापरामुळे कोणत्याही प्रकारचा त्वचा रोग होत नाही. मात्र, हे कापड तयार करण्यासाठी मनुष्यबळ अधिक लागत असल्याने सद्या विक्री दरापेक्षा उत्पादन खर्च जास्त असल्याने हातमाग कापडाची निर्मिती कमी प्रमाणात होत असल्याचे पांडुरंग पोतन यांनी म्हटले आहे.
या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या हातमाग व यंत्रमागवर उत्पादित वस्त्रे जसे कॉटन साडी, इरकल साडी, मधुराई साडी, खादी साडी, धारवाड साडी, मधूराई सिल्क साडी, सेमी पैठणी, खादी सिल्क साडी, प्रिंटेड ड्रेस, वर्क ड्रेस मटेरियल, पटोला ड्रेस, कॉटन परकर, टॉप पिस, सोलापूर चादर, बेडशीट, नॅपकिन, सतरंजी, पंचा, टॉवेल, वुलनचादर, दिवाणसेट, प्रिंटेड बेडशीट, पिलो कव्हर, लुंगी व शर्ट, कुर्ता, बंडी, गाहून, विविध प्रकारच्या विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. तसेच, सुती व खादी कापडाच्या विक्रीवर 20% टक्के सुट ठेवण्यात आली आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.