श्रीवर्धन येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
शिवकालीन शस्त्रास्त्रांची नवीन पिढीला माहिती व्हावी त्याचप्रमाणे युद्धाच्या वेळी विविध प्रकारची शस्त्र ही कशी वापरली जायची याची प्रात्यक्षिके शिवरुद्र मर्दानी आखाडा, श्रीवर्धन यांच्या मार्फत नगरपरिषद शाळा क्रमांक एक येथे शस्त्र प्रदर्शन कार्यक्रमा दरम्यान दाखवण्यात आली.
प्रशिक्षक शुभम चवरकर (अलिबाग) यांनी उपस्थित श्रीवर्धन वासियांना काठी, बाणा, बनाटा, पट्टा, दांडपट्टा, तलवार, मराठा धोप, खांडा, भाला, कट्यार, फरशी, कुर्‍हाड अशा विविध शस्त्रांची माहिती देताना उपस्थितांना शिवकालीन शस्त्र हाताळण्याची संधी देते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अनुभवण्याची संधी दिली.
शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी व निवासी नायब तहसीलदार विपुल ढुपे यांनी केले. या वेळेस शिवरुद्र मर्दानी आखाडा प्रशिक्षक शैलेंद्र ठाकूर, अ‍ॅड.संतोष सापटे, तेजस ठाकूर, मयुरी वैद्य, रूपाली सुखदरे, अमोल खेराडे हे मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version