भाले विद्यालयात रानभाज्यांचे प्रदर्शन

| खांब | वार्ताहर |

तांबे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलाताई पवार विद्यालय भाले येथे परिसरातील विविध रानभाज्यांचे प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. कीटकनाशके किंवा कोणत्याही मेहनतीशिवाय उगवणाऱ्या या रानभाज्यांमधून आपणास विविध प्रकारची जीवनसत्वे, खनिजे उपलब्ध होतात, जे शरीराला उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांनी संकलन केलेल्या विविध रानभाज्यांमध्ये भारांगा, धानंगा, करटोली, कुर्डू, कुडा, टाकला, करंद, कपाल फोडी, केना, गाभोली, घोळ आखूड, चिचुरडा, सुरण, कवळा, पेवा, पात्री, गोमटी, गाभोळी, मसाले पान, आलू पान, तेरी, घोटवेळ, दिंडा, तिळाचे पान, आखूड आदींसह तब्बल 105 प्रकारच्या रानभाज्या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.

या कार्यक्रमाला माणगाव तालुक्यातील सहाय्यक कृषी अधिकारी संतोष सुराडकर, तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रमोद शिंदे, शा.व्य. समितीच्या अध्यक्षा अस्मिता चाळके, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रीती यादव, सदस्य दत्ताराम खांबे, गणेश पवार, सपना बाईत, निर्मला सांगले, भीम धाडवे, जयंत शिंदे, भाले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिणगारे, सहायक शिक्षक चव्हाण, बापट, कुडली हायस्कूलचे वरिष्ठ शिक्षक नरेश महाडिक, सहा.शिक्षिका सौ.मेने तसेच विविध भाले-पहूर येथील ग्रामस्थ, पालक व महिला वर्ग, विद्यार्थी, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रचना कळमकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version