पनवेल परिसरात दुर्मिळ सरड्याचे अस्तित्व


निसर्गप्रेमींना न्याहाळण्याची संधी
पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरात षरप Fan Throated Lizard या दुर्मिळ सरड्याचे अस्तित्व दिसून येत आहे.त्यामुळे ऐन पावसाळ्यात निसर्गप्रेमीना जंगलाची भटकंती करताना हा दुर्मिळ सरडा नजरेस पडला तर नवल वाटायला नको. अनेक निसर्ग प्रेमी नेहमी डोंगराळ रानात फिरत असतात त्यावेळी विविध पक्षी दर्शन घडते असतात आज च्या घडीला अनेक प्राणी पक्षी नामशेष होत आहे आजही विविध पक्षी निसर्ग प्रेमी संस्था नामशेष प्राणी काही अवशेष मिळत का या शोधतात पनवेल निसर्ग प्रेमी शादुर्ल वारंगे पनवेल च्या डोंगराळ राना वनात फिरताना षरप Throated Lizard दर्शन घडले.

पनवेल मध्ये मोकळ्या माळरानावर फिरत असताना अनुभूती संस्थेचे सदस्य निसर्गप्रेमी शार्दूल वारंगे यांना पाल सदृष्य प्राण्या मध्ये येणार्‍या सरड्याच्या मादीचे दर्शन झाले ,
ह्या सरड्याच्या नराला मानेखाली सफेद पिवळसर रंगाचा पडदा असतो. ज्याचा उपयोग इतर नर सरड्यावर वर्चस्व आणि मादीला आकर्षित करण्याकरता केला जातो.ह्या प्रजातीतील निळा रंगा चा पडदा असलेला सरडा घाट माथ्यावर सापडतो .

पिवळ्या रंगाचा पडदा असलेल्या सरड्याचे अस्तित्व ठाणे डोंबिवली परिसरात बघितले गेले आह.रायगड परिसरात फारश्या नोंदी नाहीत.मुंबई येथील बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी मध्ये कार्यरत असलेले सरिसृप वर्गातील प्राणीतज्ञ वरद गीरी आणि मानद वन्यजीव संरक्षक अमित चव्हाण यांनीही हा सरडा दुर्मिळ असल्याचे नमूद केले आहे. ह्यातील नराचा पडदा असलेला फोटो हा ठाणे येथील प्रथमेश देसाई यांच्या आणि मादी चा फोटो शार्दूल वारंगे यांचा पनवेल परिसरातील आहे

Exit mobile version