| मुरूड | प्रतिनिधी |
शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार किल्ले प्रतापगड ते स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडपर्यंतची 80 कि.मी.ची दर्याखोर्यांतून काट्याकुट्यातून दोन हिरकणी व तीन मावळ्यांनी खडतर मोहीम फत्ते केली आहे. ही मोहीम हाती घेऊन महाराजांना अनोखी मानवंदना दिली आहे. या मोहिमेचे डेक्कन हायकर व आऊट डोअर या टीमतर्फे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत अतुल मोरे, संकेता नरोडे, अक्षय बेंडके, मोनाली बेंडके, विपुल कारखानीस अशी सहभागी झालेल्या मावळे व हिरकणींची नावे आहेत.
या मोहिमेत शारीरीक क्षमतेचा कस लागला कारण तब्बल 80.03 किमीची ही पायी वारी करण्यात आली. संकेता नरोडे आणि मोनाली बेंडके ह्या दोघी बहुतेक पहिल्याच स्त्रिया असतील ज्यांनी या मार्गाने पायी प्रवास केला. या मोहिमेत सहभागी सर्व सदस्यांचे डेक्कन हायकर व आऊट डोअर टीमतर्फे अभिनंदन करण्यात आले.