शाळेय वस्तू महागल्या पालकांच्या खिशाला मोठा फटका

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
10 जून पासून शाळा, कॉलेज सुरू होणार आहे. मात्र या वर्षी असंख्य पालकांना शालेय वस्तू खरेदी करताना त्यांच्या खिशाला महागाईची मोठी झल बसणार आहे. एका बाजूला विद्यार्थी शाळेत जाण्यास उत्सुक आहेत, तर दुसर्‍या बाजूला आपण एवढी महागडी वही, कंपास, रंगपेटी, छत्री, रेनकोट, शुज, दप्तर अशा अनेक शालेय वस्तूंच्या किंमती आता वाढल्या असल्यामुळे पालकांना याचा मोठा फटका बसणार आहे.

गेल्यावर्षी वह्या 250 रुपये डझन होत्या त्याच वह्या या वर्षी 300 रुपये डझन झाल्या आहेत. छत्री गेल्यावर्षी 400 रुपयापर्यत मिळत होती तीच आज 500 रुपये झाली आहे. असेच सर्वत वस्तूचे झाले आहे. प्रत्येक वस्तू मागे गेल्या वर्षापेक्षा 50 ते 100 रुपयानी वाढ झाली आहे. काही ठिकाणच्या शाळांमध्ये विशेषत: प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिला जातो. मात्र हायस्कूल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना गणवेश खरेदी करावा लागतो. यावर्षी गणवेशाच्या किंमती ही वाढल्या आहेत. विद्यार्थी जरी शाळेत जाण्यासाठी उत्सुक असले तरी सामान्य माणूस वाढत्या महागाईने चिंताग्रस्त झाला आहे.

Exit mobile version