। चिपळूण । वार्ताहर ।
शहरात असणार्या विधवा,वयोवृद्ध निराधार,घटस्फोटीत महिलांसाठी द वे फॉरवर्ड ग्रुप,कारवान ग्रुप,नोबडी एव्हर स्लिप्स हंगरी इत्यादी विविध सामाजिक संघटना एकत्र येऊन एक अनोखा प्रयोगशील उपक्रम राबवित आहेत.
यामध्ये शहरातील या महिलांसाठी परकार कॉम्प्लेक्स याठिकाणी शिलाई मशिन्स आणि जेवण बनविण्यासाठी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.याठिकाणी येऊन या महिलांनी कपडे शिवणे तसेच जेवण बनवून त्याचे जेवणाचे डबे उपलब्ध करून देण्याचे काम देण्यात आले आहे.यामाध्यमातून या महिलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न या संस्थांच्या माध्यमातून केला जात आहे.याठिकाणी अनेक महिला याचा लाभ घेत असून येथे बनविण्यात येणारे जेवणाचे डबे नाममात्र दरात वितरित केले जात आहेत. अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग या संस्थाच्या माध्यमातून चिपळूण मध्ये केला जात असून भविष्यात असे उपक्रम विविध शहरात करण्याचा मानस या संस्थांचे प्रतिनिधी यांनी केला आहे.अधिक माहितीसाठी या योजनेत सहभागी होण्यासाठी इब्राहिम बोबेरे मोबाईल क्रमांक 9820288872 येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांना स्वावलंबनासाठी प्रयोगशील उपक्रम
