खोपोलीत मस्को कंपनीत स्फोट

आवाजाने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण
। खोपोली । प्रतिनिधी ।
मस्को कंपनीमध्ये लिक्वीड ऑक्सिजन भरलेल्या उच्चदाब मधून मटेरियल कंपनीच्या टाकीमध्ये अनलोड करत असताना अचानक त्या ठिकाणी स्फोट झाला, त्यामुळे तेथे असलेल्या चार टाक्यापैकी तीन टाक्या बाधित झालेल्या आहेत. यावेळी झालेल्या स्फोटामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. कंपनीच्या आवारात असलेल्या या ऑक्सिजन प्लांटमध्ये ऑटोमॅटिक सिस्टीम असल्याने तेथे टँकर ड्रायव्हर व्यतिरिक्त कोणीच नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली. मस्को कंपनीमध्ये लिक्वीड ऑक्सिजन भरलेल्या उच्चदाब मधून मटेरियल कंपनीच्या टाकीमध्ये अनलोड करत असताना अचानक स्फोट झाला. या घटनेचे वृत्त कळताच खोपोली नगरपालिका अग्निशमन यंत्रणा, खोपोली पोलीस स्टेशनची टीम, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली. अपघातच्या टीमचे धनंजय गिध यांनी घटनास्थळी येऊन तांत्रिक बाबी तपासल्या त्यांच्यासोबत इनॉक्स कंपनीचे एक्सपर्ट देखील होते. खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिरीष पवार, एपीआय मारुती आंधळे यांनी घटने मागची पार्श्‍वभूमी समजून घेत तपास कार्य सुरू केले आहे.

Exit mobile version