आरसीएफ अपघात: एसीचे काम सुरु असताना झाला स्फोट

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ कंपनीत बुधवारी सायंकाळी भीषण स्फोट झाला. याबाबत अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनूसा टेरिझो ग्लोबल या कंपनीच्या ठेकेदारांना एसी सप्लाय व इन्स्टॉलेशनचे काम देण्यात आले होते. त्यानूसार बुधवारी एसी इन्स्टॉल करीत असताना हा भीषण स्फोट झाला.

यामध्ये ठेकेदार कंपनीचे सहा कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. तसेच जखमींना आरसीएफ रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आल्याचे आरसीएफच्या अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र या स्फोटात किती जणांचा मृत्यू झाला हे अजुनही गुलदस्त्यात आहे.

Exit mobile version