पश्चिम बंगालमध्ये एक्स्प्रेसचा भीषण अपघात; 15 जणांचा मृत्‍यू, 60 जखमी

कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक

| कोलकाता | वृत्तसंस्था |

पश्चिम बंगालमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी (दि.17) सकाळी 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. जलपाईगुडी इथे कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीची एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेनंतर पॅसेंजर रेल्वेचे काही डब्बे रुळावरुन घसरले आहेत. प्राथमिक माहितीनुसार 15 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या अपघातात 60 प्रवासी जखमी झाले आहेत.


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच स्थानिक पोलीस निरिक्षकांना घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती ममता बॅनर्जींनी दिली आहे. रुग्णवाहिका, डॉक्टर आणि मदतकार्यासाठी बचाव पथकेही घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. युद्धपातळीवर मतदाकार्य सुरु आहे. रंगापानी स्थानकाजवळ हा अपघात झाला असून रेल्वेमंत्री अश्विवी वैष्णव यांनीही या अपघातासंदर्भात शोक व्यक्त केला आहे. रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. युद्धपातळीवर कारवाई सुरू केली आहे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. सध्या अपघातात किती प्रवासी जखमी आहेत, याची अधिकृत आकडा उपलब्ध झालेली नाही.

Exit mobile version