पनवेलमध्ये एक्सप्रेसचा मालडब्बा आगीच्या भक्षस्थानी; पहा व्हिडिओ

कोईम्बतूर येथून हिस्सार येथे जाणाऱ्या ट्रेनच्या माल डब्ब्याला आग

| पनवेल | प्रतिनिधी ।


तामिळनाडूतील कोईम्बतूर येथून हरियाणातील हिस्सार येथे जाणाऱ्या ट्रेनच्या माल डब्ब्याला आग लागण्याची घटना कोकण रेल्वे मार्गांवरील पनवेल तालुक्यातील पिसार्वे या ठिकाणी घडली. घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी पोहचलेल्या सिडकोच्या कळंबोली अग्निशमन दलाच्या खारघर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून, आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जावनानी दिली आहे.


दुपारी अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेत रेल्वेतील मालाडब्यात ठेवण्यात आलेले सामान आगीच्या भक्षस्थानी पडले असून, जवळपास दोन तासाच्या अथक प्रयत्नाने नियंत्रणात आलेली ही आग कशा मुळे लागली याचा शोध अधिकारी घेत आहेत. आगीमुळे कोईम्बतूर हुन  हिस्सारला जाणाऱ्या या एसी एक्सप्रेस ट्रेन मधील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

Exit mobile version