| पनवेल । वार्ताहर ।
मुंबई गोवा महामार्गावर पेणहुन पनवेल बाजूकडे जाणाऱ्या लेनवर निसान कंपनीच्या कारने अचानक पेट घेतली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
![](http://krushival.in/grygrars/2023/01/-लागलेली-कार-e1674895643194.jpeg)
मिलिंद गुजर हे निसान कंपनीची मॅग्निएट मॉडेल कारने (MH 04 KR 8064) जात असताना कर्नाळा खिंड क्षणभर विश्रांती हॉटेलचे जवळ पोहोचल्यावर त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतली. गुजर यांनी ताबडतोब गाडीतून बाहेर पडत पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. साई वाहतूक बिट चे सहाय्य्क पोलीस निरीक्षक शिर्के व स्टाफ तसेच अग्निशमन दलाच्या घटनास्थळी पोहचुन सदर आग आटोक्यात आणली.