। मुंबई । प्रतिनिधी ।
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार आता दहावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर असणार आहे आणि बारावी बोर्डासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर असणार आहे.
बोर्डाने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे आवेदन पत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.






