| अलिबाग | वार्ताहर |
सिडकोच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी-2022 करिता ऑनलाइन शुल्क भरणा करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तथापि, सोडतीसाठीच्या तारखेमध्ये किरकोळ बदल करण्यात आला असून, सोडत 8 फेब्रुवारी 2023 तारखेऐवजी 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती सिडको व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रकाप्रमाणे महागृहनिर्माण योजना दिवाळी-2022 करिता ऑनलाइन अर्ज नोंदणी 21 जानेवारीपर्यंत करता येईल व ऑनलाइन अर्ज 22 जानेवारीपर्यंतच सादर करता येईल. तथापि, नोंदणी व अर्ज सादर केलेल्या अर्जदारांना ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी संधी मिळावी यासाठी दिनांक 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. स्वीकृत अर्जदारांची प्रारुप यादी 6 फेब्रुवारी रोजी तर स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी 8 फेब्रुवारी रोजी सिडकोच्या हीींिीं://श्रेीींंशीू.लळवलेळपवळर.लेा या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. योजनेची संगणकीय सोडत 10 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे, असेही सांगण्यात आले आहे.