मोफत धान्य योजनेला मुदतवाढ

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

देशातील गरीब जनतेसाठी सुरु केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेता पाच वर्षांची मुदत वाढ देण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. यामुळे देशातील 80 कोटी गरीब जनता दिवाळीची विशेष भेट मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाहीर सभा घेतल्या दोन्ही ठिकाणच्या प्रचारसभांमध्ये त्यांनी केंद्राची मोफत धान्यपुरवठा योजना आणखी पाच वर्ष सुरू ठेवण्याचे जाहीर केले. कोरीना महामारीच्या काळात म्हणजे 30 जून 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गोरगरीब जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ असे पाच किलो प्रति माणसी धान्य मोफत दिले जाते या योजनेता वेळोवेळी मुदत वाढ मिळत राहिली आहे.

Exit mobile version