पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

| नाशिक | प्रतिनिधी |

राज्यातील पुरपरिस्थितीमुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी विनाविलंब शुल्कासह दि. 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आधी ही मुदत दि. 01 ऑक्टोबर 2025 पर्यंत होती. विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या (कृषी पदविका शिक्षणक्रम वगळता) पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा संभाव्यपणे येत्या दिनांक 23 डिसेंबर 2025 पासून आयोजित करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. त्यामुळे सर्व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी अनुत्तीर्ण विषयाचे परीक्षा अर्ज विद्यापीठाच्या संकेत स्थळास भेट देऊन लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने भरावेत, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

शैक्षणिक वर्ष 2025- 26 च्या विविध शिक्षणक्रमात प्रवेशित नियमित विद्यार्थ्यांची सत्र व मागील परीक्षेतील अनुत्तीर्ण विषयाची पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची हिवाळी परीक्षा येत्या 23 डिसेंबर 2025 पासून आयोजित करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. पूर पुरपरिस्थितीमुळे या परीक्षेकरिता ऑनलाईन परीक्षा अर्ज विनाविलंब शुल्कासह सादर करण्यास दिनांक 01 ऑक्टोबर ते 07 ऑक्टोबर 2025 अशी मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह दिनांक 08 ते 13 ऑक्टोबरपर्यंत तर विशेष विलंब शुल्कासह दिनांक 14 ते 18 ऑक्टोबर 2025 पर्यंत हा ऑनलाईन परीक्षा अर्ज भरता येईल. मात्र यानंतर कुठल्याही कारणास्तव मुदतवाढ मिळणार नाही. ऑनलाईन परीक्षा अर्ज हा  https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamv2_ExamformSubmission_PpAmAtWise.aspx या लिंकवर उपलब्ध आहे.

परीक्षा शुल्क हे केवळ ऑनलाईन भरता येईल. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेच्या अद्ययावत माहितीसाठी, वेळापत्रकासाठी, वेळापत्रकातील होणाऱ्या संभाव्य बदलाबाबत विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1494 यास वेळोवेळी भेट द्यावी, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version