| अलिबाग । वार्ताहर ।
केंद्र शासनाने खरीप हंगाम 2022-23 अंतर्गत राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता शेतकरी नोंदणी करण्याबाबत कळविले होते. त्यानुषंगाने मंजूर झालेल्या धान व भरडधान्य खरेदी केंद्रावर सब एजंट संस्थांमार्फत धान व भरडधान्य शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत दि.15 ऑक्टोबर पर्यंत होती. परंतु NeML पोर्टलवरील मागील हंगामातील दि.11 ऑक्टोबर रोजीच्या शेतकरी नोंदणीच्या अहवालानुसार शेतकरी नोंदणी अल्प प्रमाणात झाल्याचे दिसून आले. या कारणास्तव धान व भरडधान्य खरेदीकरिता NeML पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्यासाठी दि.25 ऑक्टोबर रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तरी ज्या शेतकर्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्या शेतकर्यांनी नोंदणीकरिता LIVE PHOTO अपलोड करण्याकरिता स्वतः उपस्थित राहावे. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी नोंदणीकरिता ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येणार नाही, याची संबंधित सब एजंट संस्थानी नोंद घ्यावी, असे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे डॉ.अतुल नेरकर यांनी सूचित केले आहे.