शेतकरी नोंदणीसाठी मुदतवाढ

| रायगड | वार्ताहर |

पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदी करीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दि.31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापी, ऑनलाईन पोर्टलवरील माहितीनुसार, मागील हंगामाचा विचार करता शेतकरी नोदणी पुरेशी झाल्याचे न दिसल्याने शासनाने या बाबीचा विचार करुन या चालू हंगामामध्ये पुरेशा प्रमाणात शेतकरी नोंदणी व्हावी, म्हणून पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता, दि. 15 जानेवारी 2024 अखेरपर्यत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी दिली आहे.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून आधारभूत किंमतीचा शेतकर्‍यांना लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने राज्यात खरेदी केंद्र सुरु केली आहेत. हंगाम 2016-2017 पासून विकेंद्रीत खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Exit mobile version