। पेण प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा दक्षिण भाजपचे उपाध्यक्ष मंगेश दळवी यांच्याविरुद्ध पेण पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपलब्ध माहिती अहवालानुसार, आरोपीने फिर्यादीला मारहाण, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी तसेच खंडणीची मागणी केल्याचा आरोप केला आहे.
पेण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून धमकावत मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात मंगेश दळवी यांच्यासह अन्य काही जणांनाही आरोपी करण्यात आले असून, पेण पोलीस पुढील तपास करत आहेत. या गुन्ह्याचा तपास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.






