नागोठणे येथे नेत्रचिकित्सा शिबीर

| नागोठणे | प्रतिनिधी |

नागोठणे लायन्स क्लबचे सदस्य जयराम पवार यांनी आपल्या दिवंगत मातोश्री लक्ष्मीबाई मारुती पवार यांच्या स्मरणार्थ आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पीटल, नवीन पनवेल यांच्या सहकार्याने नागोठणे लायन्स क्लबने येथील शांतीनगर भागातील स्व. बाळासाहेब ठाकरे बाल उद्यानात बुधवारी (दि.6) नेत्रचिकित्सा शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात 20 नागरिकांनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली. यामध्ये मोतिबिंदू आढळलेल्या 8 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पीटल येथे पाठविण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर व परिसरातील नागरिक नेत्र तपासणीसाठी यावेळी उपस्थित होते. लायन्स क्लबच्या कार्यक्रमाला नेहमी सहकार्य करणारे मोहन म्हात्रे व फिजिओथेरपिस्ट डॉ. काव्या टेमकर यांचा या शिबिराच्या निमित्ताने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी लायन डॉ.अनिल गीते यांनी मोतीबिंदू शास्त्रक्रिये नंतरची डोळ्यांची निगा व काळजी याविषयी अतिशय महत्वपूर्ण माहिती उपस्थित नागरिकांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एमजेएफ लायन विवेक सुभेकर यांनी केले.

Exit mobile version