। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे येथील दानशूर व्यक्तिमत्व लायन प्रकाश जैन यांच्या सौजन्याने त्यांचे वडील स्व. सरेमल प्रतापमला जैन यांच्या स्मरणार्थ रविवार दि.19 डिसेंबर रोजी लायन्स क्लब नागोठणे तर्फे मोफत डोळे तपासणी शिबीर व अल्पदरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन नागोठण्यातील लायन्स व्हिजन येथे करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नागोठणे व पंचक्रोशीतील 70 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली . यामधे 18 मोतिबिंदू रुग्ण आढळले . त्या सर्व रुग्णांची नेत्र शस्त्रक्रिया लायन्स हेल्थ फाऊंडेशन चोंढी (अलिबाग) येथे करण्यात येणार असून मोतीबिंदू रुग्णांना आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या टेस्ट डॉ.अनिल गिते हे अल्पदरात करून देणार असल्याची माहिती एमजेएफ लायन विवेक सुभेकर यांनी दिली. या शिबिराप्रसंगी लायन्स क्लब नागोठणेचे प्रेसिडेंट सुजित महागावकर, प्रकाश जैन, डॉ. मोहन हिंदूपूरसर, यशवंत चित्रे, विवेक सुभेकर, संतोष शहासने, दौलत मोदी, विवेक करडे, श्वेता सुभेकर, सिध्देश काळे व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.