। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगावात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजय मेथा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बुधवारी (दि.09) महेंद्र मेथा यांच्या सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश पाटील व त्यांच्या सहकार्यांनी 79 रुग्णांची तपासणी करून 33 नेत्ररुग्णांना पनवेल येथे नेऊन त्यांच्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हे शिबीर दर महिन्याच्या एका बुधवारी होत असते.
माणगावात गेली दोन वर्षांहून अधिक काळापासून 29 वेळा शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व माणगाव येथील प्रसिद्ध उद्योजक विजय मेथा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे मोफत नेत्ररोग व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आतापर्यंत 2 हजार 600 हुन अधिक नेत्ररुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेले आहेत. नेत्ररोग शिबिराला दरमहिन्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून दक्षिण रायगडातून या शिबिराचा लाभ जनता घेत आहे. दक्षिण रायगडातील माणगाव, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर, रोहा आदी तालुक्यांतील रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विजय मेथा, सुप्रिया शिंदे, तनुजा मेथा, छाया मेथा, विधिता मेथा, मनीष मेथा यांच्यासह शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेलचे टीम व्यवस्थापक प्रकाश पाटील, डॉ. ईशा निरगुटकर, दीपाली म्हात्रे, नियती शिंदे, सायली उतेकर, कल्पेश सावंत यांनी सहकार्य करीत विशेष परिश्रम घेतले.