| पनवेल | वार्ताहर |
लायन्स क्लब पनवेलतर्फे 54 वे नेत्र चिकित्सा शिबिर शनिवार दि.06 ते सोमवार दि.08 जानेवारीपर्यंत व्ही. के. हाय स्कूल पनवेल येथे सकाळी 10 ते दुपारी 03 या वेळेत मोफत नेत्रतपासणी व अल्प दरात मोतीबिंदु शस्त्रक्रिया सुसज्ज हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. यावेळी रुग्णांची डोळे तपासणी करुन गरजूंना अल्पदरामध्ये चष्मे देण्यात येतील. शस्त्रक्रिया करण्यालायक रुग्णांची राहण्याची, जेवणाची, औषधांची व इतर सर्व व्यवस्था पनवेल लायन्स क्लबतर्फे करण्यात येणार आहे. रुग्णांनी येताना रेशनकार्ड व आधार कार्ड व त्यांची झेरॉक्सची प्रत सोबत आणावे. तरी गरजू व्यक्तींनी त्याचा लाभ घ्यावा तसेच आपल्या भागातील गरजू व्यक्तींनी नेत्र शिबिराबाबत कळवावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.नाव व नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी एस. जि. चव्हाण 9372413342, अशोक गिल्डा 9819009292 याच्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.