दी लाईफ फाऊंडेशनतर्फे नेत्र तपासणी

| सोगाव | वार्ताहर |

आरोग्य, शैक्षणिक तसेच इतर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील दी लाईफ फाऊंडेशन, ग्रुप ग्रामपंचायत झिराड तसेच शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे शुक्रवारी (दि.15) राजिप शाळा झिराड येथे आयोजन करण्यात आले होते.

या नेत्रतपासणी शिबिरात एकूण 131 नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली. यामध्ये 19 रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक असलेल्या 8 रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे नेण्यात आले. तर उर्वरित 11 रुग्णांना वैद्यकीय अडचणीमुळे जाता आले नाही. या शिबिरात नेत्रदोष असणाऱ्या रुग्णांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी करण्यासाठी दी लाईफ फाऊंडेशनचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version