| माणगाव | वार्ताहर |
माणगावात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे बुधवारी (दि.14) वृत्तपत्र विक्रेते नितीन मेथा यांचे हॉल जुने एसटी स्टॅन्ड जवळ माणगाव याठिकाणी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी 154 रुग्णांची तपासणी करून 78 नेत्ररुग्णांना पनवेल येथे नेऊन त्यांच्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विजय मेथा, सुप्रिया शिंदे, तनुजा हेमंत मेथा, छाया मेथा, विधिता मेथा, मनीष मेथा डॉ. प्रकाश पाटील, डॉ. शिली वर्गीस, मृण्मयी जाधव, निशा शिंदे, नियती शिंदे, विशवनाथ पाटील, रामदास पवार व त्यांचे सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सदर शिबीर हे दर महिन्यातील एका बुधवारी आयोजित करण्यात येत असल्याने या शिबिराचा लाभ बहुजन समाजातील गरीब गरजू नेत्र रुग्णांनी अवश्य घ्यावा असे आवाहन विजय मेथा यांनी केले आहे.