एसटी चालकांची नेत्र तपासणी

पेणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचा नाविन्य उपक्रम
| अलिबाग | प्रतिनिधी |
थळ येथील आरसीएफ कंपनीनजीक पेणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत वाहनांच्या नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. कार्यक्रमाचे औचित्य साधत चालकांसाठी नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला चालकांसह अनेकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण, माणुसकी प्रतिष्ठान, जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यावतीने प्रवासी, वाहन चालकांसाठी डोळे, आरोग्य तपासणी व व चष्माचे वाटप हा कार्यक्रम बुधवारी घेण्यात आला. यावेळी परिवहन अधिकारी महेश देवकाते, डॉ. राजाराम हुलवान आदी मान्यवरांनी वाहतूकीचे नियम, व आरोग्यबाबतची माहिती देऊन मार्गदर्शन केले.

शिबीरामध्ये एकूण 200 पेक्षा अधिक प्रवासी व चालकांचे डोळे तपासण्यात आले. यापूर्वी खारपाडा या ठिकाणी शिबीर घेण्यात आले होते. त्याला एक हजार 700 लाभार्थ्यांकडून प्रतिसाद मिळाला.

Exit mobile version