| खोपोली | प्रतिनिधी |
होनाड ग्रामपंचायत हद्दीतील प्रसोल केमिकल्स कंपनीतर्फे तीन ग्रामपंचायतीच्या हद्दीतील महिलांसाठी हळदीकुंकू निमित्ताने नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाचशेहुन अधिक महिलांनी आपल्या डोळ्याची तपासणी करून घेतली. खालापूर तालुक्यातील साजगाव अडोशी विभागातील होनाड ग्रामपंचायत हद्दीतील प्रसोल केमिकल्स कंपनी कित्येक वर्षे कार्यरत आहे. प्रत्येक वर्षी कंपनी आपली प्रगती करीत सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच समाजपयोगी कार्य करीत आहे. तरुणांना रोजगार तर शैक्षणिक क्षेत्रात विध्यार्थ्यांना सहकार्य तसेच, संस्कृतिक कार्यक्रमात कंपनीचा मोलाचे सहकार्य लाभते. यावर्षीही साजगाव, होनाड आणि आत्करगाव ग्रामपंचायतीच्या महिलांसाठी सामूहिक हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन कारण्यात आले होते. या निमित्ताने सर्व महिलांची नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कंपनीच्या शोभा शेट्टेण, स्मिता गोखले, सुप्रिया पाटील ,आरोही बेर्डे, रूपाली विचारे, पूजा साळुंखे, संगीता मारोथिया यांच्या हस्ते उपस्थित महिलांना हळदी कुंकू, वाण आणि भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमासाठी विनोद खवले, आशा पाटील, वर्षा पाटील, सचिन प्रभू, उदयकुमार पाटणकर, योगेश पाटील, दर्शन पिंगळे, प्रवीण काळे यांसह कंपनीचा महिला स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.