पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा औद्योगिक वसाहती मधील कारखान्याला आग लागण्याची घटना रविवारी ( ता.29) रात्री साडे नऊ च्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.आगीत अद्याप तरी कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.