तळोजा एमआयडीसीत कारखान्याला आग

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
तळोजा एमआयडीसीमधील न्यू केमिकल झोनमधील भूखंड क्रमांक जी 13/2 वरील पवन वूड या लाकडाचे साहित्य तयार करणार्‍या कारखान्याला आग लागण्याची घटना रात्री घडली. आगीची व्याप्ती वाढल्याने शेजारी असलेल्या रिदमा या कारखान्याला देखील आगीची झळ बसली .आगीत कारखान्यातील साहित्य जाळून मोठे आर्थिक झाल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी लागलेल्या या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या तळोजा अग्निशमन दल, कळंबोली अग्निशमन दल नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हाणी झालेली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. सोमवारी दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हाणी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे बरोबर सहा वर्षा पूर्वी औद्योगिक वसाहती मधील गौसिया कोल्ड स्टोरेज या कारखान्यात विजेच्या धक्क्याने तीन कामगार दगावले होते. त्या घटनेची आठवण मात्र सर्वांना झाला.

अग्निशमन यंत्रणा कमकुवत
तळोजा औद्योगिक वसाहती मधील कारखान्याना आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशा नंतर कारखान्यात असलेल्या अपुर्‍या अग्निश्मन यंत्रनेबाबत चर्चा नेहमीच केली जाते. मात्र घटनेच्या काही दिवसा नंतर अशा घटना विस्मृतीत जात असून,करखण्याची अग्निशमन यंत्रणा भक्कम करण्याच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना राबवल्या जात नसल्याचे चित्र दुसर्‍या एखाद्या दुर्घटनेनंतर उघड होत असतात. जवळपास 950 लहान मोठे कारखाने असलेल्या तळोजा औद्योगिक वसाहती मधील कारखान्यात आगी घटना कायम घडत असतात.त्या टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज निर्माण झालेली आहे.

Exit mobile version